म्हैशाळ योजेनचे पाणी कोरडा नदीमध्ये दाखल.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 28, 2020

म्हैशाळ योजेनचे पाणी कोरडा नदीमध्ये दाखल..

 म्हैशाळ योजेनचे पाणी कोरडा नदीमध्ये दाखल.. 


कोरडा नदीवरील मेडशिंगी गावापर्यतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेणार - आमदार शहाजी बापू पाटील
सांगोला दि.२८(क.वृ.): कृष्णा नदीचे पुराचे पाणी म्हैशाळ योजनेतुन दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय झाल्याने म्हैशाळ योजनेतुन कोरडा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होऊन हे पाणी कोरडा नदीमध्ये सोनंद येथे दाखल झाले असून सुमारे सात वर्षानंतर कोरडानदीमध्ये मोठया प्रमाणात पाणी आले आहे हे पाणी 200 क्यूसेस विसर्गाने कोरडा नदीमध्ये सोडले असून कोरडा नदीवरील मेडशिंगी गावा पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत अशे आदेश आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले. 
शुक्रवार दि.२८ ऑगस्ट रोजी म्हैशाळ, टेंभू, उपासासिंचन योजना नीरा -उजवा कालवा यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्या  सोबत सांगोल्यात चर्चा करताना टेंभू योजनेतून पाणी माणनदी मध्ये मेथवडे पर्यंत व म्हैशाळ योजनेतुन  पाणी कोरडा नदीवरील मेडशिंगी पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्याच्या सुचंना आमदार शहाजीबापू पाटील यांनी  दिल्या. याबरोबरच टेंभू व म्हैशाळ बंदीस्त पाईपलाईनची अपूर्ण कामे गतीने पूर्ण करणे व सांगोला तालुक्यातील वंचीत गावे या दोन्ही योजना सोबत नीरा उजवा कालव्याच्या योजेनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्याचा आराखडा तयार करण्याचा सूचना दिल्या या चर्चासाठी आमदार शहाजीबापू पाटील. माजी  नगराध्यक्ष रफीक नदाफ. सुनील पवार यांच्या सह टेंभू उपसा सिंचन 1सांगली चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे. कार्यकारी अभियंता सचिन पवार. उपविभागीय अभियंता सानप. उपविभागीय अभियंता केंगार. म्हैशाळ2 सांगलीचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील. उपविभागीय अभियंता श्री चोपडे . यांच्यासह  नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले. उपविभागीय अभियंता सुहास शिंदे.  हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages