Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्धवा अजब तुमचे सरकार, आता तरी मंदिराचे उघडा दार

 उद्धवा अजब तुमचे सरकार, आता तरी मंदिराचे उघडा दार


चेतनसिंह केदार-सावंत यांची आघाडी सरकारवर टीका




सांगोला (प्रतिनिधी): केंद्र सरकारने देवस्थाने सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी करूनही महाविकास सरकारने राज्यातील नागरिकांना कोरोनाची भीती दाखवून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. मंदिरे, देवस्थाने बंद असल्याने भाविकांना दर्शन मिळणे कठीण झाले आहे. उद्धवा अजब तुमचे सरकार, आता तरी मंदिराचे उघडा दार अशी जोरदार टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी आघाडी सरकारवर केली. चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात श्री अंबिका मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घंटा वाजवून सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.     
          कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. दारूची दुकाने, मॉल,महामार्गावरील ढाबे सुरू करण्यात आले आहेत. मात्र मंदिरे, देवस्थाने बंद आहेत. राज्यातील धार्मिकस्थळे आणि मंदिरे सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. 
       याप्रसंगी चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, महाराष्ट्रातही सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे अशी मागणी भाविकांतून करण्यात येत आहे. मात्र राज्यात मंदिरे सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. जाणीवपूर्वक भाविकांना कोरोनाची भीती दाखवून मंदिरे, देवस्थान उघडण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. सरकारला मंदिरे उघडण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार २९ ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील श्री अंबिका मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. मंदिरे बंद असल्याने हार-फुले विक्रेते, मिठाई व्यावसायिक, लहान मोठे व्यावसायिक यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. कोट्यवधी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर आघाडी सरकारने मंदिरे, देवस्थाने सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला.
       यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगरसेवक आनंदा माने, गजानन भाकरे, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, आनंद फाटे, एन वाय भोसले, अनिल कांबळे, वैजयंती देशपांडे, शीतला लादे, नागेश जोशी, मानस कमलापूरकर, अभिमन्यू पवार, देविदास कांबळे, काशिलिंग, गावडे, प्रवीण जानकर, उमेश मंडले, लक्ष्मीकांत लिगाडे, संग्राम गायकवाड, ओंकार देशपांडे, संतोष खांडेकर, ओंकार कुलकर्णी आदि उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments