महुद बु येथे सलून व्यवसायिकाकडून होत आहे,कोरोना विषाणू संरक्षण नियमांची पायमल्ली--अर्जुन लुबाळ
योग्य ती कारवाई न केल्यास ग्रामपंचायती समोर करणार उपोषण
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) महुद बु ता सांगोला येथे सलून व्यवसायिकाकडून शासनाने नेमून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात असून अगोदरच सांगोला तालुक्यात कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या महुद बु ग्रामपंचायतीने मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे, सलून व्यवसायिक शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच सलून दुकाने चालू करण्यासाठी परवानगी दिली आहे, मात्र हे सलून व्यावसायिक तोंडाला मास्क न वापरता,सॅनिटायझरचा वापर जशी आठवण येईल तसा करून, अवाच्या सवा दरांची आकारणी करीत आहेत.सलून व्यावसायिकांच्या या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढण्यास मदत होईल,भविष्यातील हा धोका टाळायचा असेल तर या सलून दुकानाची तपासणी ग्रामपंचायत ने करावी,अन्यथा ग्रामपंचायती समोर उपोषण करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लुबाळ यांनी दिला आहे.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ,प्रदिप आसबे,समाधान माने,आबा शेळके,राजू येडगे, लिंगा ढाळे, अनिल दिडवाघ,अनिल बनसोडे,मारुती गाढवे,विजय मरगर आदि उपस्थित होते.
0 Comments