मोहोळ तालुक्यात राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

मोहोळ तालुक्यात राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 मोहोळ तालुक्यात राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


मोहोळ दि.२६(क.वृ.): महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष,रिपाइं आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस मोहोळ तालुक्यात रिपाइंचे   पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे उपाध्यक्ष हणमंत कसबे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
हणमंत कसबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने मोहोळ ग्रामीण रूग्णालय,नरखेङ ग्रामीण रूग्णालय येथे कोरोना महामारीपासून बचावासाठी वाढदिवसाच्यानित्ताने  सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.तसेच मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, शिरापूर,खंङाळी येथेही विविध उपक्रम राबवण्यात आले होते.या गावांतही वाढदिवसा निमित्ताने सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोहोळ शासकीय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गायकवाड, नरखेड शासकीय रुग्णालयाचे डॉ. अहमद पटेल उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस राजाराम जगताप तालुका युवक अध्यक्ष रजनिश कसबे,तालुका कार्याध्यक्ष अनिल सर्वगोड, संघटक सचिव दत्ता गाडे, युवक आघाडीचे सरचिटणीस शहाजी सरवदे, गौतम कसबे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages