Hot Posts

6/recent/ticker-posts

वीरशैव व्हीजनतर्फे 50 जंगम समाजबांधवांना बिल्व वृक्षांचे वाटप

 वीरशैव व्हीजनतर्फे 50 जंगम समाजबांधवांना बिल्व वृक्षांचे वाटप


सोलापूर दि.२६(क.वृ.): पूर्वीच्या काळी जीवो जीवस्य रक्षति असे म्हटले जायचे. परंतु सध्याच्या वातावरणात वृक्षांचे महत्त्व पाहून वृक्षो जीवस्य रक्षति असे म्हणावे लागेल असे प्रतिपादन खासदार डॉ. श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी (गौडगाव) यांनी केले.
आज मंगळवारी श्री वीरभद्रेश्वर प्रकट दिनानिमित्त शेळगी येथील श्री शिवयोगधाम मठ येथे जंगम समाज बांधवांना वीरशैव व्हीजनतर्फे बिल्व वृक्षांचे वाटप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ष. ब्र. डॉ. श्री विरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी (बाळापुर), ष. ब्र. श्री विरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी (मुखेड), ष. ब्र. श्री महादेव शिवाचार्य स्वामीजी (वाई), रेल्वे सल्लागार समिती सदस्य महादेव कोगनुरे, वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळाचे अध्यक्ष शिवयोगीशास्त्री होळीमठ उपस्थित होते. 
यावेळी उपस्थित सर्व शिवाचार्य स्वामीजींना व वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळाच्या 50 जंगम समाजबांधवांना बिल्व वृक्षांचे वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी वीरशैव व्हीजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी,  सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, युवक आघाडी सदस्य सोमनाथ चौधरी, महेश हिरेमठ आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments