Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने बाह्यवळण रस्ता दुरुस्तीचे निवेदन

 शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने बाह्यवळण रस्ता दुरुस्तीचे निवेदन


सांगोला दि.२७(क.वृ.): सांगोला शहरातून जाणाऱ्या   वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट बाह्यवळण रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशा आशयाचे निवेदन सांगोला नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला शहरातून जाणारा बाह्यवळण बायपास रस्ता अत्यंत खराब झालेला असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे शहरातील महूद रेल्वे गेट मिरज रेल्वे गेट रेल्वेच्या मेंटेनेस कॅरिता वारंवार बंद करण्यात येतात त्यामुळे पर्यायी वाहतूक या बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात येते त्यामुळे हा बाह्यवळण रस्ता पूर्णपणे खचला असून पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने या मार्गावर दररोज  छोटे-मोठे  अपघात या ठिकाणी होत आहेत तर या रस्त्याची दय निय अवस्था झाली असून याकडे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून दैनंदिन होणारी वाहनचालकाची गैरसोय दूर करावी व त्याचबरोबर राज्य मार्गाचे काम ज्या पद्धतीने सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे त्याच धर्तीवर हा बायपास बांधण्यात यावा व दरवर्षी नगरपालिकेत याची डागडुजी करण्यात वेळ व खर्च वाचेल व शहरवासीयांची व सर्वच वाहनधारकांची चांगली सोय होईल असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे यावर मुख्याधिकारी यांनी तात्काळ बांधकाम अभियंता यांना या रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश करण्यात आले आहे.  सदर निवेदन देतेवेळी शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments