Hot Posts

6/recent/ticker-posts

रामदरा तलावातुन नेली विनापरवाना विद्युत लाईन

रामदरा तलावातुन नेली विनापरवाना विद्युत लाईन


तुळजापूर दि.२७(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानी मंदीराच्या खालच्या बाजूला असणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन दोन अंतर्गत उसिंयो 2 रामदरा लघु पाटबंधारे तलावाचा कार्यक्षेञातुन विनापरवाना इलेक्ट्रिक लाईन ठेकेदाराने नेल्या प्रकरणी कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्रमांक 1 उस्मानाबाद कार्यालयानै या बाबतीत कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी  विभागीय कार्यालाय तुळजापूर यांना केली असुन या बाबतीत महावितरण काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील श्रीतुळजाभवानी मंदीराचा पायथ्याशी असणाऱ्या रामदरा लघुपाटबंधारे तलावाची उंची वाढविण्याचे काम प्रगती पथावर असतानाही सदर साठवण तलावाचा बुडीत क्षेञातुन महावितरण ची विद्युत लाईन कुठलीही पुरपरवानगी न घेता नेली आहे हि विद्युत वाहिनी लाईन नेताना पञा ध्दारे मोबाईल ध्दारे सुचना देवुनही ठेकेदार व महावितरण कंपनी यांनी या पञास केराची टोपली दाखवत नेली ही लाईन काम करताना रामदरा साठवण तलावाचा रा़ँकटाँक मधील दगड काढुन ही लाईन नेण्यात आली आहे. त्यामुळे तलावाचा स्थर्यते बाबतीत धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.सदरील विद्युत लाईनमुळे जिवितहानी, वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे महावितरण कार्यालयाचा अभियंत्यास कळवून ही ती लाईन नेली आहे.
हा प्रकार म्हणजे, सदरील कामाचा माध्यमातून जादा बिल काढण्याचा प्रयत्न ठेकेदाराचा असल्याची चर्चा होत आहे.या पार्श्वभूमीवर तलावाला धोकादायक ठरणाऱ्या या विद्युत लाईन काम प्रकरणी ठेकेदारासह संबंधित विभागाचा अधिकारीची  चौकशी करुन दोषीवर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments