Hot Posts

6/recent/ticker-posts

तिर्थक्षेञी कोरोनात प्रशाषाणाच्या निष्काळजीपणामुळे गुटखा विक्री जोमात !

 तिर्थक्षेञी कोरोनात प्रशाषाणाच्या निष्काळजीपणामुळे गुटखा विक्री जोमात !


तुळजापूर दि.२५(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना काळात गुटखा विक्री   जोमात असल्याने हे अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भष्ट्राचार निर्मुलन समितीने जिल्हाधिकारी  यांना निवेदन देवुन केले आहे, तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना महामारी काळात गुटखा विक्री सह अवैध धंदे खुलेआम जोरात चालू आहेत यापुर्वी या प्रकरणी चार निवेदन देवुन ही त्यावर कारवाई नाही विशेष म्हणजे कोरोना काळात इतर वेळी पेक्षा अवैधरित्या गुटखा विक्री चालु असुन या कडे प्रशाषणाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष आहे,यात पोलिस प्रशाषाण व अन्न भेसळ प्रतिबंध खात्याचा निष्किळजी पणा दिसुन येत आहे.
या बाबतीत अनेक वेळा निवेदन देवुन ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा दुर्लक्षित पणा नागरिकांचा जीवाशी खेळण्यासारखा आहे, तरी अवैध धंद्या विरोधात कडक निरपेक्ष कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इषारा संघटनेचे विजय रावण भोसले यांनी दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments