Hot Posts

6/recent/ticker-posts

उंदरगावच्या उपसरपंचपदी ऋषीकेश तांबिले यांची बिनविरोध निवड

 उंदरगावच्या उपसरपंचपदी ऋषीकेश तांबिले यांची बिनविरोध निवड


माढा दि.२५(क.वृ.):- माढा तालुक्यातील 9 सदस्य असलेल्या उंदरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी नाईकवाडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी ऋषीकेश तांबिले यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर सुतार व ग्रामविकास अधिकारी समाधान जाधव यांनी 24 ऑगस्ट रोजी जाहीर केले.
या ग्रामपंचायतीवर आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक तथा विद्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अमोलनाना सौदागर चव्हाण यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन उपसरपंच ऋषीकेश तांबिले यांचा सत्कार सरपंच चंचलाताई सौदागर चव्हाण व विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक अमोलनाना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला.
याप्रसंगी माजी सरपंच प्रशांत चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर मस्के,बालाजी नाईकवाडे,ताई तात्या शिंदे,पल्लवी चव्हाण,ओंकार चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments