नगरहून कर्नाटकात जाणारे मांस मंद्रुप पोलिसांनी पकडले दोन टेम्पोसह आठ लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त

सोलापूर दि.२५(क.वृ.): अहमदनगरहुन विजयपूरला (कर्नाटक) दोन टेम्पो भरून चाललेले मांसाचे तुकडे मंद्रूप पोलीसांनी पकडले. यात दोन जणांना अटक करण्यात आली असून वाहनासह एकूण आठ लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली.
याबाबत मंद्रुप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री मंद्रुपचे पोलीस कर्मचारी साहेबराव चव्हाण, रोहन पवार, सुनंद स्वामी व बापूसाहेब गायकवाड हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी कामतीहून मंद्रुपच्या दिशेने दोन टेम्पो भरून मांसाचे तुकडे कर्नाटकात जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. सदरची दोन्ही वाहने येळेगाव येथे आल्यानंतर थांबवले. तपासणी केली असता त्यात मांसाचे तुकडे असल्याने दुर्गंधी येत होती. त्यानंतर दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली. यातील (एम एच ४२/ए क्यू ३३९२) या पांडुरंगाच्या टेम्पोमध्ये एक लाख २० हजाराचे मांसाचे तुकडे व वाहन असे चार लाख ७० हजार रुपये मुद्देमाल मिळाला, तर (एम एच १६/ ए वाय २३६) या पिकप मध्ये ९० हजाराचे मांस व वाहन असे तीन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहन चालक मुजफ्फर आयुब शेख राहणार खडकत (ता. आष्टी, जि. बीड) व मन्नान इब्राहिम शेख, राहणार अमरवाडा, अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर वाहनातील मांस कोणत्या प्राण्याचे आहे याच्या तपासणीसाठी मंद्रूपचे पशुवैद्यकीय अधिकारी यांना शाम्पल देण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार प्रमोद असादे करीत आहेत.
0 Comments