अल्पवयीन अत्याचार प्रकरणी युवकास वीस वर्ष सक्त मजुरी व दहा हजार दंड

तुळजापूर दि.२५(क.वृ.):- शहरातील अल्पवयीन मुलीस घरात नेवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा विशेष सञ न्यायालयाचा न्यायमुर्ती श्रीमती आर जी राय यांनी वीस वर्षिय आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सोमवार दि24रोजी सुनावली, या बाबतीत अधिक माहीतीअशीकी शहरातील ऐका अल्पवयीन मुलगी रंगपंचमी दिन रंग खेळुन घरी आली असता तिच्या शेजारी राहणाऱ्या आकाश उर्फ सोन्या मंगेश भोसले रा शेकापूर ता जि उस्मानाबाद यांने तिस पाठीमागुन झाप टाकुन पकडून आरडाओरड करु नये म्हणून तोंडात नँबकीन कोंबुन तिला त्याचा घरात नेवुन तिच्यावर जबरी बलात्कार केला .
या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुरंन 136/19कलम 376,376(3) भादंवी कलमासह 4 ,8,12 पोस्का अंतर्गत गुन्हा नोंद केला याचा तपास तात्कालिन पो उप नि योगेश खटाणे यांनी केला.
सदर खटल्यात सरकारी वकील अँड जयंत देशमुख यांनी सात साक्षादार तपासले मा कोर्टापुढे आलेला पुरावा व शाषकिय अभियोक्ता यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष सञ न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोठावुन सदर पिडीतेस दंडाची दहा हजार रक्कम देण्याचे आदैशित केले.
0 Comments