Hot Posts

6/recent/ticker-posts

लाच घेताना महिला तलाठी ताब्यात

लाच घेताना महिला तलाठी ताब्यात


तुळजापूर दि.२४(क.वृ.):- तालुक्यातील वडगाव लाख येथील महिला तलाठी ने आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना   खासगी मदतनीसासह उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
या घटनेने महिला कर्मचारी ही लाच घेण्यात आता पुढाकार घेत असल्याचे दिसुन येते ही कारवाई सोमवार दि24रोजी तुळजापूर येथील तलाठी कार्यालयात  करण्यात आली.
तक्रारदार पुरुष व त्यांचा भाऊ यांनी मौजे जवळगा मेसाई, ता. तुळजापूर येथे त्यांचे आईचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 329 मधील क्षेत्र 4 हे.6 आर व तक्रारदार यांचा भाऊ यांचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 244 मधील 26 आर व शेत गट नंबर 246 मधील 17 आर या शेत जमीनीचे वाटणी पत्र 100 रू चे स्टँप पेपरवर नोटरी करुन  घेतले होते.  सदर वाटणीपत्राआधारे फेर मंजूर करून 7/12 नोंद घेण्यासाठी कागदपत्रे वडगाव लाख सज्जाच्या महिला तलाठी संजीवनी शिवानंद स्वामी यांच्याकडे दिले होते.
या कामासाठी तलाठी संजीवनी स्वामी व त्यांचे खाजगी लेखनीक सुभाष नागनाथ मोठे यांनी तक्रारदार यांचेकडे 8,000/- रू. लाचेची मागणी केली.तक्रारदाराने या प्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधून तक्रार दिली असता आज दि.२४/८/२०२० रोजी तुळजापूर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी संजीवनी स्वामी यांना खासगी मदतनीस सुभाष मोटे यांचे हस्ते ८०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले.
याबाबत तुळजापूर पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक श्री.अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पो.ह. रवींद्र कठारे,दिनकर उगलमुगले,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,तावस्कर व चालक करडे यांनी मदत केली.
Reactions

Post a Comment

0 Comments