Hot Posts

6/recent/ticker-posts

नरखेड येथील शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

 नरखेड येथील शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू


नरखेड दि.१७(क.वृ.):-मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना इलेक्टरीक शॉक लागून मयत झाल्याची घटना शनिवारी रात्री  नऊच्या सुमारास घडली आहे. हनूमंत सुरेश मोटे (वय ४९) असे मयत झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,नरखेड ता मोहोळ येथील शेतकरी हनुमंत मोटे हे  स्वतःच्या शेतात आपल्या कुटूंबासह राहत होते. शेती करून ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतात काम करत असताना  शेतातुन गेलेल्या केबलचा अचानक शॉक बसला. त्यांना तातडीने नातेवाईकांनी उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या मृत्यूने नरखेड गावावर शोककळा पसरली असून नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली, एक मुलगा,वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments