15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2020

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण

सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम  यांनी सर्व शहरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच महापौर श्रीकांचना यन्नम व मान्यवरांनी ध्वजारोहणा नंतर संविधान वाचन करण्यात आले.यावेळी महापालिकेच्या वतीने कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव मध्ये जे मोलाचे योगदान दिले आहे आशा महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून महापौर व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापालिकेच्या कामगारांसाठी घेतलेल्या निर्णय जाहीर केले.त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाने माहे सप्टेंबर 2020 च्या सर्वसाधारण सभेत पूर्वी सविस्तर प्रशासन प्रस्ताव सादर करत आहे त्यास मंजुरीबाबत कारवाई करण्यात येईल.तसेच शासन निर्णयानुसार सोलापूर  महानगरपालिकेत झाडूवाली बिगारी व सफाई कामगार यांना लाड कमिटी शिफारसी लागू असून लाड कमिटी लागू असलेल्या पदाकरिता आकृतिबंधाची,स्थायी व अस्थायी पदाची अट लागू नसल्याने या पूर्वी मंजूर असलेले अधिसंख्या पदाच्या मर्यादित प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे तसेच आजला वारसाहक्काने मंजूर प्रकरणातील प्रतीक्षा यादी मध्ये असलेले बारा वारसदारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसांना अनुकंपा तत्वा खाली नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे त्यानुसार अनुकंपातत्वाखाली मंजूर प्रकरणातील प्रतीक्षा यादीतील कनिष्ठ श्रेणी लिपिक, शिपाई ,मजूर, आया इत्यादी उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 1995 नंतर ही रोजंदारी सेवक कार्यरत आहेत सदर सेवकांचे अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास महासभेमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आजला कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती घेऊन एक आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 1 सप्टेंबर पासून रोजंदारी सेवकांना प्रतिदिन 20 रुपये वाढ करण्यात येत आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक,नगरसेविका व रोजंदारी सेवक,मानधन स्थायी, अस्थायी  या सर्वांना एक लाख  रुपयाचे कॅशलेस (मेडिक्लेम) एक सप्टेंबरपासून कुटुंबाच्या व्यक्तीप्रमाणे लागू करणार आहे.नागरिकांना महापालिकेत अथवा विभागीय कार्यालयात येऊन त्यांची नागरिक समस्या मांडण्याची घरबसल्या ऑनलाईन नोंदवून त्या किमान कालावधीमध्ये संबंधित विभागाकडून सोडवण्यासाठी चेंज माय सिटी हे ऑनलाईन ऍप हे 1 सप्टेंबर 2020 पासून कार्यान्वित करण्यात येत आहे.आशा अनेक निर्णय आज महापौरानी स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केले.या निर्णयाचा स्वागत करत महापालिका कामगार कृती समिती तसेच इतर कामगार संघटनाने महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी.शिवशंकर याचं आभार मानले.यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली,परिवहन सभापती जय साळुंखे,महिला व बालकल्याण सभापती कुमुद अंकाराम,मनपा आयुक्त पी.शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खैरादी, नगरसेवक विनोद भोसले,नगरसेवक अविनाश बोंमडयल,नगरसेविका श्रीदेवी फुलरे ,नगरसेवक भारतसिंग बडूरुवाले,नगरसेविका निर्मला तांबे,उपायुक्त पंकज जावळे,उपायुक्त धनराज पांडे,उपायुक्त अजयसिंह पवार,स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रंबक ढेगळे पाटील ,कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे, प्रसाशन अधिकारी कादर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages