कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2020

कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश

 कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघनप्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई   जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश




सोलापूर, दि.6(क.वृ.): शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक स्थळीकामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावेचेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाकडोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाहीयाची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नयेअसे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. दुचाकीवर केवळ चालकतीन चाकी वाहनात चालक व इतर दोन आणि चार चाकी वाहनात चालक व इतर दोघांना परवानगी असेलअसे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

        उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल
अ.क्र.
उल्लंघनाचे स्वरूप
आकारण्यात येणारा दंड
1
मास्क न वापरल्यास
100 रूपये
2
दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास
500 रूपये
3
दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्यास
750 रूपये
4.
तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या आढळल्यास
500 रूपये (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
5
चारचाकी वाहनातून तिघांपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास
500 (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)
6
निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास (अत्यावश्यक सेवा वगळून)
एक हजार दंड.
दोनवेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित.
7
साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकाने/ आस्थापनामध्ये आढळल्यास
सात दिवसांपर्यंत दुकान सील
8
दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास
500 रूपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रूपये.
9
होम क्वारंटाईन योग्य रितीने न पाळल्यास
एक हजार रूपये.
10
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास
200 रूपये
11.
सुरक्षित अंतर न ठेवल्यास
100 रूपये (प्रत्येकी)
12.
सार्वजनिक ठिकाणी दारूपानतंबाखूचे सेवन केल्यास
500 रूपये.
13.
दुकानदार/व्यावसायिक/फिरते फळ व भाजी विक्रेते मास्क न वापरल्यास
100 रूपये.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदारनायब तहसीलदारमंडल अधिकारीपोलीस प्रशासनगट विकास अधिकारीविस्तार अधिकारी (आरोग्य)नगरपालिका मुख्याधिकारीस्वच्छता निरीक्षकतलाठीग्रामसेवक यांनी कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये दंडात्मक कारवाई करावीअसेही त्यांनी आदेशाता नमूद  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages