उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयांचे मंजूर २०% वेतन सुरू करा : घरासमोरच शिक्षकांनी केले उपोषण
पोखरापूर ( प्रतिनिधी ) राज्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयांचे २०% वेतन अदा करण्यासाठी शासनाने अर्थ संकल्पिय अधिवेशनात १०६कोटी ७४ लाख ७२लाख रूपये निधी मंजूर केला आहे,परंतु अद्याप सदर निधी वितरित करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला नाही,.मंजूर २०% निधी वितरित करण्याचा आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावा या मागणीसाठी राज्यातील उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापकांनी १मे महाराष्ट्र दिनी स्वतः च्या घरासमोर लाक्षणिक उपोषण करुन शासनाचे लक्ष वेधले आहे.
सध्या देशात कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना १८- २० वर्षापासून पगार नाही ,विना वेतन अध्ययनाचे काम करून नंतर मजूरीची कामे करून उदरनिर्वाह करीत असलेल्या प्राध्यापकांना उपाशीपोटी राहावे लागते आहे.अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, पगार नाही, कुटुंबियांना अन्नधान्याची समस्या कशी सोडवायची हा प्रश्न सर्व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडला आहे.कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे खाजगी मंजूरीसाठी जातायेत नाही, गरीबांना शासन स्तरावरून जसे मोफत धान्य, वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्याप्रमाणे विनाअनुदानित शाळेतील २०वर्षापासून अध्यापनाचे काम करणा-या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सुविधा व अन्नधान्य द्यावे अशी मागणी काही प्राध्यापकांनी यावेळी केली.
उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान मिळण्यासाठी सन २०१४-१५ मध्ये शासनाने मूल्यांकन केले आहे, मुल्यांकनात पात्र झालेल्या शाळाची पुन्हा पडताळणी,त्यातील त्रुटी-पूर्तता,पुन्हा नवीन माहितीचा अहवाल, जिल्हा कमिटीची शिफारस, विभागीय कमिटीची शिफारस ,नंतर अघोषित नंतर पात्र म्हणून घोषित करणे, निधीची तरतूद करणे, आणि आता निधी वितरित करण्याचा आदेश निर्गमित करणे,आदी प्रक्रियामध्ये मुल्यांकनात पात्र होऊन सुद्धा सहा वर्षे उलटून गेली आहेत.आता शासन महाआघाडीचे आहे आमच्या मागणीची निश्चितपणे वदखल घेईल अशी भावना उपोषणार्थीनी व्यक्त केली आहे वेतन सुरु करावे अशी मागणी करत उच्चमाध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी १मे रोजी आपल्या घरासमोर लाक्षणिक उपोषणास जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
0 Comments