आरोपींना फाशीची शिक्षा द्या- राजाभाऊ खिलारे
अकलूज( प्रतिनिधी) माळशिरस येथे राहणाऱ्या रोहित रणदिवे या मातंग समाजाच्या युवकाची कीरकोळ कारणावरुन निर्घुण हत्या करण्यात करण्यात आली. त्याचप्रमाणे खंडाळी ता. माळशिरस येथील रामचंद्र खंडागळे या व्यक्तीचा भांडण सोडवण्यासाठी का आला म्हणून दगडाने मारून खून करण्यात आला.वरील घटनांचा दलित महासंघाच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करीत आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित महासंघाचे प.म. अध्यक्ष राजाभाऊ खिलारे यांनी केली आहे. मातंग समाजावरील वाढते अन्याय-अत्याचार खून ह्या सर्व प्रकरणांची शासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे. व आरोपींना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे.आम्ही दलित महासंघाच्या वतीने या दोन्ही खुन्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी लाॅक डाऊन संपताच प्रांतअधिकारी कार्यालय अकलुज येथे मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढणार आहोत. मातंग समाजातील बंधू-भगिनी या मोर्चात मोठ्या प्रमाणे सहभागी होऊन रोहीत रणदिवे व रामचंद्र खंडागळे यांचा खुन करणारे आरोपींना मोकाअंतर्गत कार्यवाही करुन फाशीची शिक्षा द्यावी.त्या कुटुंबांचे शासनाने पुनर्वसन करावे.व त्यांना आर्थिक मदत करावी.त्या कुटुंबास संरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,गृहमंत्री, जिल्हा अधिकारी,प्रांतअधिकारी अकलुज,यांना देण्यात आले आहे. दलितांच्या वरील वाढत्या हल्ल्याचा खुनाच्या घटनेची दखल गांभीर्याने न घेतल्यास मातंग समाजाच्या लोकांना रस्त्यावर उतरून वेगळा विचार करावा लागेल याची शासनाने वेळीच दखल घ्यावी असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दलित महासंघाचे प. म. अध्यक्ष राजाभाऊ खिलारे म्हणाले. सदर निवेदनावर सौरभ वाघमारे, बिपीन बोरावके,बच्चन साठे यांच्या सह मान्यवर लोकांच्या सह्या आहेत.
0 Comments