टेंभुर्णीत कॅन्सर फाऊंडेशनच्या वतीने निर्जंतुकीकरण अभियान
टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] चला प्रशासनाला सहकार्य करू,कोरोनाला हद्दपार करू या संकल्पनेतून अभियान.
येथील टेंभुर्णी शहरामध्ये कॅन्सर फाऊंडेशनच्या वतीने सरपंच प्रमोद कुटे,ग्रामसेवक तसेच आरोग्य अधिकारी अमोल माने-शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली, सध्या कोरोना या आजाराने संपुर्ण जगात थैमान घातले असून सोलापूर जिल्ह्यातही याचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे,टेंभुर्णी परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने कॅन्सर फाऊंडेशनच्या वतीने हे अभियान चालविण्यात आले. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे निर्जंतुकीकरण करून या अभियानास सुरुवात करण्यात आली त्यावेळी ग्रा.पं. सदस्य गणेश केचे व ग्रामसेवक मधुकर माने हे उपस्थित होते.या अभियानांतर्गत संपूर्ण टेंभुर्णी शहरामध्ये दोन ट्रॅक्टर च्या सहाय्याने दोन दिवस निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
अभियानाचे नियोजन योगेश भणगे, महेश कोठारी, श्रीकांत लोंढे, परमेश्वर खरात,डॉ.विनायक गंभीरे,महेश कोकीळ,पारस कटारिया,स्वप्नील धोका,गोवर्धन नेवसे, सुनील महामुनी,संजय अदापुरे यांनी इतर सभासदांच्या मार्गदर्शनाने केले,अभियान पार पाडण्यासाठी कॅन्सर फाऊंडेशनचे युवा सभासद अनिमेष भणगे,ओम स्वामी, किरण कांबळे,आशुतोष क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले, या कामी निलेश नष्टे, बाळासाहेब भोज,राजकुमार सरवदे,रेवण क्षीरसागर, चंद्रशेखर नष्टे व टेंभुर्णी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कोरोनाच्या संकटाशी सामना करताना कॅन्सर फाऊंडेशन मार्फत गोर गरिबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केलेले असून, कॅन्सर ग्रस्तांची औषधे, प्रवास व औषधोपचार या अडचणींचे निवारणही करण्यात येत आहे.टेंभुर्णी परिसरातील कॅन्सरग्रस्तांच्या अडचण निवारणासाठी 9850452255 या भ्रमणध्वनी वर संपर्क करावा असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments