पोलिसांच्या संपर्कातील बारा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह--प्रांताधिकारी उदयसिंह भोसले
नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास,त्या बारा जणांचे दुसरी कोरोना चाचणी होणार १४ मे ला
सांगोला (जगन्नाथ साठे) सांगोला तालुक्यातील सोनंद( लक्ष्मीनगर, लक्ष्मीवाडी) येथे सोलापूर येथील रहिवासी असलेला पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला होता. त्या अनुषंगाने त्याच्या निकटतम संपर्कातील सांगोला तालुक्यातील रहिवासी असणारे एकूण बारा लोक मेडशिंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आलेले होते. या सर्व संशयित रुग्णांची करोना संसर्ग बाबत चाचणी घेण्यात आली होती . त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व अहवाल कोरोना संसर्ग बाबत निगेटिव आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.त्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सोनंद (लक्ष्मीनगर,लक्ष्मीवाडी) येथील संशयित रुग्णांची पुढील दुसरी करोना संसर्ग चाचणी दिनांक 14 मे रोजी घेण्यात येणार आहे. आणि त्या चाचणी निष्कर्षा च्या अनुषंगाने सदर संशयित रुग्ण कोरोना बाधित आहे, अगर कसे हे अंतिम ठरवले जाईल. तोपर्यंत सदरचे संशयित रुग्ण हे मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही भोसले यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सांगोला शहरात नागरिकांची गर्दी वाढली असून प्रशासनाच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर येवू नये,परजिल्हयात आणि परराज्यात जावू इच्छिणाऱ्या नागरीकांनी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय प्रमाणपत्र घेताना आणि तहसिल कार्यालयात फॉर्म अपलोड करताना सोशल डिस्टन्स नियमाचे पालन केले करावे,असे आवाहन ही प्रांताधिकारी भोसले यांनी केले आहे.
0 Comments