राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रेरणेतून जवळा ग्रामपंचायतीमध्ये थर्मल स्क्रीनिंग मशीन दाखल
थर्मल स्क्रिनिंग मशिनव्दारे नागरिकांची तपासणी करणारी राज्यातील पहीली जवळा ग्रामपंचायत
कोरोना महामारी संकटामध्ये जवळेकरांना मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांचा मोठा आधार
जवळे ग्रामपंचायतीचा आदर्शवादी उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवावा : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
सांगोला प्रतिनिधी : कोरोना विषाणूपासुन नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी व गावाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने थर्मल स्क्रीनिंग मशीन उपलब्ध करून गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी हा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सदर जवळा ग्रामपंचायतीचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने घेऊन ग्रामीण भागातील व वाड्या-वस्त्या वरील नागरिकांची तपासणी करून कोरोना मुक्त गाव आणि वाड्या-वस्त्या करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी व विषाणूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता म्हणून प्रशासन सर्वच बाजूने प्रयत्नशील आहे. यामध्ये आता मोठ-मोठ्या शहरानंतर सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने महत्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात प्रथमच जवळा ग्रामपंचायतीने थर्मल स्क्रीनिंग ची मशीन उपलब्ध केली आहे. सदर मशीनद्वारे गावातील नागरिकांची तपासणी केली जाणार असून याचा शुभारंभ काल मंगळवार दि. 5 मे रोजी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची तपासणी करून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून सांगोला शहरानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागांमध्ये म्हणजेच सांगोला तालुक्यातील जवळे गाव सुरक्षित व कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वीही विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. तसेच यापुढेही ग्रामपंचायतीकडून कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावापासून गाव आणी वाड्या वस्त्या मुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरुच आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून सध्या गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे. यासोबतच ग्रामपंचायतीने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जवळा गावातील असाध्य आजार असणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून एक डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. व अशा नागरिकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोरोना विषाणूंची साखळी निर्माण होऊ नये यासाठी या साथ रोगाच्या काळात या नागरिकांची विशेष काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने ही मोहीम सुरू केली आहे.
आज संपूर्ण जगात ज्या कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणू पासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिला नाही. सोलापुर सारख्या शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात पुढे येऊन समाजात जनजागृती जागृती करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये जवळा ग्रामपंचायत गाव व परिसरात जनजागृतीची महत्त्वाची भूमिका राबवत आहे. नागरिकांना स्पीकर द्वारे, वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे संदेश दिले जात आहेत.
अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबविणारे जवळा गाव एक माँडेल म्हणून जिल्ह्यात नावारुपास आले आहे. ग्रामीण भागात राज्यातील पहीली घंटागाडी २००९ साली जवळा ग्रामपंचातीनेच खरेदी केली,
जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणीपूरवठा योजन असेल, तिर्थक्षेत्र विकास कामे अशा अनेक वैविध्यपूर्ण व जनहितकारी योजना राबवणारी जवळा ग्रामपंचायत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहीलाच उपक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आ.दिपकआबांच्या संकल्पनेतून जिवनावश्यक वस्तुंची घरपोच सुविधा देण्याच्या अभिनव उपक्रमाचे अनूकरण जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने केले. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येने मोठे असलेल्या जवळा गावात किराणा माल,धान्य,भाजीपाला,मांस,अंडी, शुध्द पाणी,अँटोमोबाईल सेवा,मेन्स सलून सेवा अशाप्रकारच्या अनेक सेवांचा लाभ जवळावासियांना घरपोच देण्यात येत आहे. जवळा गावात ४ दिवसातून एकदा मोफत सॅनिटायझरचा फवारणी सुरू केली आहे. तसेच संपूर्ण जवळा गावातील गरजू व गोरगरिबांकरिता १९०० कुटुंबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले आहे. तसेच सांगोला तालुक्यामध्ये गोरगरीब व गरजूंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकाराने दहा हजार कुटुंबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले आहे. म्हणून मा. आम. दिपक आबा साळुंखे-पाटील यांच्या कार्यपध्दतीमूळे सलग ३५ वर्षे जवळेकरांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे एक हाती सत्ता दिली आहे.
देशावर व राज्यावर जेव्हा संकट येथे तेंव्हा देशाचे नेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब संकटावर मात करण्यासाठी धावून येतात तसेच जिल्ह्यात व तालुक्यामध्ये एखादे संकट आलेतर संकटावर मात करण्यासाठी हातखंड असलेले मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील प्रत्येक वेळी धावून आलेले आहेत. मग ते गारपीट असो डाळिंबाचे तेल्या अनुदान असो, आणि आज म्हैसाळ टेंभूचे पाणी संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये आनणारा नेता म्हणजे पाणीदार आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आहेत. जवळे गावाचा तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आज आज संकटकालीन परिस्थितीत गावासह तालुक्यातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा आधार मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी सजग असणे गरजेचे आहे. गावचे आणी स्वतःचे कोरोनापासून सौरक्षण आपण स्वतःच करायचे आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. त्याच वेळी त्यांना सर्व नागरिकांनी त्यांना असणारे आजाराबद्दल खरी माहिती देऊन स्वतःचे तसेच कुटुंबीयांची रक्षण करावे असे आवाहन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे.
गेली ३५वर्षापासून ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत राज्याच्या राजकारणात दखलपात्र ठरलेले दिपक आबा साळुंखे-पाटील यांच्या कार्यपध्दतीमूळे सलग ३५ वर्षे जवळेकरांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे एक हाती सत्ता दिली आहे. अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबविणारे जवळा गाव एक माँडेल म्हणून जिल्ह्यात नावारुपास ग्रामीण भागात राज्यातील पहीली घंटागाडी २००९ साली जवळा ग्रामपंचातीनेच खरेदी केली जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणीपूरवठा योजन असेल,तिर्थक्षेत्र विकास कामे अशा अनेक वैविध्यपूर्ण व जनहितकारी योजना राबवणारी जवळा ग्रामपंचायत आहे.
ह.भ.प.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या सेवेतून व दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण जवळा गाव निर्जंतुकिकरण करण्यासाठी सँनिटायझरची फवारणी गेली दिड महीन्यापासून मोफत करण्यात येत आहे.त्याचबरोबर आदरणीय काकींच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक-सामाजिक उपक्रम, मुलींच्या शिक्षाणाचे सोय करणारे व लोकहिताचे निर्णय घेणारी राज्यातील विकासाची अग्रगण्य असणारी जवळा ग्रामपंचायत आहे. समस्थ जवळेकर काकींना व दिपकआबांना भरभरुन आशिर्वाद देत आहेत.
0 Comments