Hot Posts

6/recent/ticker-posts

चौदाखडीतून पोस्टरद्वारे कोरोना जनजागरण शेटफळ ता.मोहोळ शाळेतील शिक्षक पाल्यांचा अभिनव उपक्रम

चौदाखडीतून पोस्टरद्वारे कोरोना जनजागरण
शेटफळ ता.मोहोळ शाळेतील शिक्षक पाल्यांचा अभिनव उपक्रम



       मोहोळ- जि.प.प्राथ.शाळा,शेटफळ ता. मोहोळ ही शाळा गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रमातही नेहमीच हिरीरीने सहभागी असते.याचाच एक भाग म्हणून आज सबंध देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असतानादेखील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही.यासाठी जाणीवजागृती अत्यावश्यक असल्याने शिक्षक पाल्यांनी मास्क बांधून घरातूनच पोस्टर झळकवत चौदाखडीतून कोरोना जागृतीचा संदेश दिला.अनेकांनी आपल्या कवितांमधून,गाण्यांमधून,भारुड, लावणी अशा पारंपारिक लोकसंगीताद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीव-जागृती केली.हाच धागा पकडून अ अ- अननसाचा... आ आ - आगगाडीचा... असा संबोध देणारी मुळाक्षरे आज अ म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका.आ म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा.असा संदेश देताना दिसत आहेत.शाळेतील उपक्रमशील शिक्षक रवींद्र देबडवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला.मुळाक्षरातील प्रत्येक अक्षर वापरून त्यापासून कोरोनाचा बचाव कसा करावा?त्याची लक्षणे काय?त्याची कारणे कोणती?त्यावरील उपाय कोणते?अशा विविध प्रश्नांसंबंधीचा संदेश या चौदाखडीच्या मुळाक्षरांमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या उपक्रमात ज्ञानेश रवींद्र देबडवार,सिद्धेश प्रदीप गुंड,शिवराज्ञी समाधान पवार,अर्शान असिफ अतार या चार लहानग्यांसह ओम गणेश थोरात,प्रगती गणेश थोरात,वैष्णवी राजेश कुमार कुलकर्णी,विवेक विठ्ठल पवार,सोनल विठ्ठल पवार,साईश्री प्रदीप गुंड,आर्यन बळीराम गोटणे,सत्यम समाधान पवार,समिहा असिफ अतार,श्रावणी संतोष लोंढे, समर्थ संतोष लोंढे या शिक्षकपाल्यांनी सहभाग घेतला. या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


शिक्षक मनोगत -

काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्टर झळकवत कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकले असा संदेश दिला होता.तसेच अनेकजण आपल्या नावातील वा आडनावातील आद्याक्षरांपासूनही असे संदेश देताना दिसत आहेत.यातूनच ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमात पंधरा मुलामुलींनी घरातूनच जागृती संदेश देणारे पोस्टर झळकावले.यात चार लहानग्यांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. 

Reactions

Post a Comment

0 Comments