माढा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी 5 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर - आमदार बबनदादा शिंदे
माढा/ प्रतिनिधी- (राजेंद्र गुंड) - माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यामधील विविध गावांमध्ये मुलभुत सुविधा पुरविणे करिता 2515 योजनेतंर्गत ग्रामीण भागातील गाव ते वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे,भुयारी गटार दुरुस्ती करणे अशी विकासकामे करण्यासाठी 5 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
पुढे अधिक माहीती देताना आमदार शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील अनेक ठिकाणचे गाव ते वाड्यावस्त्यांवरील रस्ते अत्यंत खराब झालेले असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.सदर रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.या मंजूर झालेल्या निधीतून गावोगावची विकासकामे लवकरच सुरू होणार आहेत.या विकास निधीची तरतुद करण्याकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्य मिळाले असून त्यामुळे माढा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
हा भरीव विकासनिधी मंजूर झालेल्या गावांमध्ये माढा तालुक्यातील भिमानगर - 10 लाख, वडाचीवाडी (अं.उ) -10 लाख, जामगांव -10 लाख, व्होळे (खु) -10लाख, उंदरगांव -10 लाख,शिराळ (मा) -10,बावी -10 लाख, चव्हाणवाडी (टें)-10 लाख, टाकळी (टें) -10 लाख,चांदज -10 लाख, आहेरगांव-10 लाख, जाधववाडी (मा) -10 लाख, भुताष्टे -10 लाख भेंड -10 लाख, उजनी (मा) -10 लाख,तांबवे (टें)-10 लाख, पालवण-10 लाख,भुईंजे-10 लाख, मिटकलवाडी-10 लाख, रोपळे (खु)-10 लाख, कापसेवाडी-10 लाख, वडाचीवाडी(उ,बु)-10 लाख, रांझणी-10 लाख,आलेगांव (खु)-10 लाख,वरवडे-10 लाख,मानेगांव-10 लाख, मोडनिंब-30 लाख,टेंभुर्णी-30 लाख,शिराळ (टें)-10 लाख, पिंपळनेर-10 लाख, रणदिवेवाडी -10 लाख, परिते-10 लाख, उजनी (टें)-10 लाख, दारफळ -10 लाख, पडसाळी-10 लाख, अकोले (बु)- 10 लाख, वेणेगांव -10 लाख, बुद्रुकवाडी-10 लाख, महातपूर-10 लाख, वेताळवाडी-10 लाख, धानोरे - 10 लाख, सुर्ली -10 लाख, अकोले (खु)- 10 लाख, रुई - 10 लाख, निमगांव (मा) - 10 लाख, चिंचोली-10 लाख, अकुंभे-10 लाख, परितेवाडी-10 लाख, सोलंकरवाडी-10 लाख, केवड - 10 लाख, खैराव-10 लाख, खैरेवाडी-10 लाख, कुंभेज-10 लाख, बेंबळे -10 लाख या गावांचा समावेश आहे.
0 Comments