ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीने फेसबुकवर ऑनलाईन
"अधिकाऱ्यांशी संवादमाला"
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीने महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त एका अनोख्या व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आले असून, लॉकडाऊनच्या काळात सर्वांना घरी बसून या व्याखानमालेचा अनुभव घेता येणार असून या व्याख्यानमालेत 4 पोलिस अधिकारी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवण्याचं स्वप्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे असते पण त्यांच्या स्वप्नांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, यामध्ये अनेक विद्यार्थी प्रवाहातुन बाहेर जातात. पण अशी अपुरी स्वप्न पाहणाऱ्या लोकांना पूर्णत्वाचा अनुभव देण्यासाठी ज्ञानक्रांती अकॅडमी प्रयत्न करतं आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून ही अनोखी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 10 मे रोजी रात्री 8 वाजता, पीएसआय दादासाहेब खुळे यांचे " बासरीने सूर दिले" या विषयावर व्याख्यान होईल. 11 मे रोजी रात्री 8 वाजता पीएसआय संजय लोखंडे यांचे " स्वप्नपूर्तीचा माझा प्रवास " दिनांक 12 मे रोजी पीएसआय नागेश जावळे यांचे, " गाव ते अधिकारी " या विषयावर, तर दिनांक 13 मे रोजी पीएसआय किशोर वागज यांचे " खाकी वर्दीतून, खाकी वर्दीकडे "या विषयावर, व्याखान होईल. ही सर्व व्याख्याने रात्री 8 वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे होतील. या सर्व व्याख्यान ऐकण्यासाठी ज्ञानक्रांती अकॅडमीच्या वतीने फेसबुक पेजच्या पुढील लिंकवर https://www.facebook.com/pg/ dnyankranti2020 आपणांस लाभ घेता येईल, अशी माहिती प्रा. नवनाथ गोडसे यांनी दिली
0 Comments