भरत शेळके जपतायेत सामाजिक बांधिलकी ;अनेक गरजूंना करत आहेत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
सांगोला (प्रतिनिधी) पोलीस प्रशासनात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविलेल्या सावे गावचे सुपुत्र,माजी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जपत सध्या कोरोनाच्या काळात लॉक डॉऊन असताना सांगोला तालुक्यातील जवळपास चाळीस गावातील गरजू आणि ज्यांचे रोजगार बंद आहे, अशा लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात येत आहे.
सांगोला तालुक्यातील सावे,देवळे,मेथवडे, डिकसळ, वाणी चिंचाळे, संगेवाडी, मेडशिंगी,पारे,अलेगाव, घेरडी आदि गावातील जवळपास सातशे लोकांना आणि वासुद रोडला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ बहुरूपी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक किटमध्ये गहू,तांदूळ, मटकी डाळ,तेल,मीठ,साखर,शेंगदाणे,सा बण, आदि वस्तुंचा समावेश आहे. एक सामाजिक जबाबदारी आणि गरजूंना मदत करण्याचे समाधान आणि कर्तव्य समजून तसेच सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने आपण वाटप करत असल्याची माहिती माजी सहायक पोलीसआयुक्त भरत शेळके यांनी सांगितले.आंबेडकर जयंती निमित्त सावे गावातील समाजबांधवांना शेळके परिवाराकडून पुरण पोळीचे साहित्य दिले होते.येणाऱ्या काळात ही आपण अशीच मदत करणार असल्याचे भरत शेळके यांनी सांगितले.
सदर जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करते वेळी सावे गावचे माजी सरपंच विक्रम शेळके,युवा नेते विजय इमडे, विनोद उबाळे,शिवाजी शेजाळ, वाणी चिंचाळे गावचे सरपंच रामहरी पाटील,पत्रकार रवि साबळे,अभिमन्यू कांबळे, तानाजी माने,उपसरपंच पांडुरंग शेळके,दयानंद शेळके,आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments