- सोनंद येथील नागरिकांनी घाबरून जाऊ नये--प्रांताधिकारी उदयसिंह भोसले
सांगोला (प्रतिनिधी) सोनंद खालचे लक्ष्मीनगर (लक्ष्मीवाडी) याठिकाणी पोलीस प्रशासनाने आंतरजिल्हा तपासणी नाक्यावर नेमणूक केलेला सोलापूर येथील रहिवासी असलेला पोलीस कर्मचारी हा कोरोना रोगाने बाधित झालेला आहे. त्यानंतर संबंधित कर्मचारी याचे शी जास्त संपर्क आलेने हाय रिस्क संपर्क म्हणून निश्चित केलेले एकूण १४ व्यक्तींपैकी १२ व्यक्तींना कोविड केअर सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे ठेवण्यात आले असून उर्वरित दोन जण हे सोलापूर येथील रहिवासी असल्याकारणाने त्यांना सोलापूर येथे पाठविण्यात आलेले आहे याच प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येऊन ते सोलापूर येथे पाठवण्यात येणार आहेत.तसेच ज्या व्यक्ती या थेट संपर्क आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत,अशा कमी धोका असलेल्या २७ जणांना या हाय रिस्क संपर्क व्यक्तींचे रिपोर्ट येई पर्यंत शाळेमध्ये विलगीकरण करण्यात आलेले आहे. सदर पूर्ण बाधित व्यक्तीने या ठिकाणी वास्तव्य केले होते अशा ठिकाणापासून तीन किलोमीटरपर्यंत सांगोला तालुक्याच्या सीमा क्षेत्रामध्ये सीमा बंद करण्यात आलेले आहेत. तर त्या पुढील सात किलोमीटर क्षेत्रामध्ये बफर झोन घोषित करण्यात आलेला आहे. सदर प्रतिबंधित क्षेत्रातील एकूण 283 कुटुंबातील 1526 लोकसंख्येचे तपासणी सहा पथकातील बारा कर्मचाऱ्यांद्वारे पुर्ण करण्यात येत आहे. सदर पूर्ण बाधित व्यक्तीने उपचार घेतलेली सोनंद येथील एक दवाखाना व सांगोला येथील एक हॉस्पिटल जास्त धोका असलेल्या व्यक्तींच्या तपासणीचे अहवाल येईपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत. सदर विषाणूचा भविष्यातील संभाव्य प्रादुर्भाव रोखण्याकरिता रुग्ण वावरलेल्या गावा पैकी मौजे सोनंद व मौजे कडलास ही गावे अत्यावश्यक सेवा म्हणजेच दूध भाजीपाला फळे व किराणामाल इत्यादी वगळता तपासणीचे अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0 Comments