Hot Posts

6/recent/ticker-posts

यम आपल्या दारी... बार्शीतील नागरिकांनी आपल्या घरातील उंबरठा ओलांडू नये

यम आपल्या दारी........ बार्शीतील  नागरिकांनी आपल्या घरातील उंबरठा ओलांडू नये 

घरातच बसावे व आपल्या आरोग्याची व कुटुंबीयांची आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशा साठी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व बार्शी शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने करोना  विषाणु बाबत जनजागृती करण्यासाठी सर्व औषध विक्रेते,कामानिमित्त बाहेर आलेले नागरिक, व्यापारी यांना भेटून या आजाराचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले . यमाच्या भूमिकेत गजानन डिस्ट्रीब्यूटरचे मालक विजयकुमार माळी व चित्रगुप्त च्या भूमिकेत संस्कृती डिस्ट्रीब्यूटर चे मालक विशाल बडदाळे यांनी  भूमिका साकारली .या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संपुर्ण बार्शी परिसरात जनजागृती करण्यात आली या उपक्रमाची नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी विशेष कौतुक केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी पोलीस प्रशासन व बार्शी केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच पदमसिंह पवार ,अभिजीत घनचक्कर, गणेश कसेगावकर,दीपक शिंदे व सवणे यांनी विशेष प्रयन्त केले
Reactions

Post a Comment

0 Comments