Hot Posts

6/recent/ticker-posts

जनसेवा संघटनेच्या कर्तुत्वान कार्याचे कौतुक

जनसेवा संघटनेच्या कर्तुत्वान कार्याचे कौतुक

अकलूज( प्रतिनिधी) लॉक डाऊनच्या परिस्थितीमध्ये डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेने असंघटित कामगार, अत्यंत गरजू गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू तर लॉक डाऊनमध्ये अडकलेले परप्रांतीय नागरिकांना जेवण पुरवण्याचे महानकार्य करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांनी करीत असलेल्या कार्याची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज शमा पवार यांनी जनसेवा संघटनेचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले.
        कोरोनारुपी महाभयंकर राक्षसाचा उद्रेक अखंड जगात सुरू असताना त्याने आपल्याही देशात शिरकाव केला आणि या कोरोनारुपी राक्षसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशात, राज्यात लॉक डाऊन  करण्यात आले.कोरोनासारख्या अदृश्य विषाणू बरोबरची लढाईही प्रत्येक मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाची ठरल्याने, घरातूनच प्रत्येकजण कोरोनाशी लढू लागले. ज्यांची हातावरची पोटे आहेत, त्यांच्या हाताची कामे थांबली.! काटकसरीने स्वतःच्या  कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍याचा काही दिवसातच खिसा रिकामा झाला. ज्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदतीचा हात मिळाला ते काहीशी समाधानीही झाले. परंतु जे असंघटित आहेत, अत्यंत गरीब आहेत, अशा कुटुंबांच्या भुकेचे काय?नक्कीच हा प्रश्न निर्माण झाले शिवाय रहात नाही ! तर अशा कुटुंबाचा शोध घेत जनसेवा संघटना अन्नदाता बनत त्यांच्यापर्यंत जेवण, अन्नधान्य पोचवीत महान कार्य करू लागले. त्यांचे या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होऊ लागले. परंतु त्यांच्या कार्याची दखल घेत, उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अककुज यांनीही त्यांचे पत्राद्वारे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले.
          अशा संकटसमयी रक्ताची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेने, संघटनेचे नेते डॉ.धवलसिंह  प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचाही विडा उचलला आणि स्वतः डॉ  धवलसिंह मोहिते-पाटील यांनी रक्तदान करीत शिबिरास सुरुवात केली. या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळत गेला. आणि तालुक्याच्या विविध गावाबरोबर इतर तालुक्यातही जनसेवा संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न होऊ लागले." जनसेवा हीच ईश्वर सेवा" या ब्रीद वाक्याचे सार्थक करीत जनसेवा संघटनेच्या सामाजिक कार्याची वाटचाल पुढे अखंड चालू आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments