वेतनासाठी अनुदानाची तरतुद करा
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेची मागणी
सोलापुर—खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी निधी नसल्यामुळे वेतन अदा करण्यात आले नाही.त्यांच्या वेतनासाठी निधीची तरतुद करण्याची मागणी शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व प्रदेशसचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
२१ खाजगी प्राथमिक शाळेतील जवळपास १०० शिक्षक १९ सप्टेंबर २०१६ च्या शासननिर्णयानूसार सरसकट २०% अनुदान पात्र असुन मागील चार वर्षापासुन २०% प्रमाणे वेतन घेत आहेत. १००% अनुदास पात्र असतानाही सरसकट २०% अनुदान देऊन या शिक्षकांवर शासनाने अन्याय केला आहे. वाढीव अनुदान टप्प्याच्या मागणीसाठी अनेक अंदोलन करण्यात आले..प्रचलित नियमानुसार अनुदानाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याने माहे एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप प्रलंबित आहे. वेतन अदा न झाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक यांनी तातडीने कार्यवाही करुन अनुदान उपलब्ध करुन द्यावे व वेतनाचा प्रश्न सोडवावा.अशी विनंती कृती समितीमार्फत करण्यात आली आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे,,महाराष्टृ राज्य शिक्षक सेनेचे मूरलीधर कडलासकर,युवक शिक्षक संघटनेचे सोमेश्वर याबाजी व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे अ.गफुर अरब यांच्या सह्या आहेत. पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनाही निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याबात विनंती करण्यात आली आहे.
0 Comments