सोलापूर शहरामधील कोरोनो बाधित भागात महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त दिपक तावरे यांनी दिली भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 16, 2020

सोलापूर शहरामधील कोरोनो बाधित भागात महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त दिपक तावरे यांनी दिली भेट

सोलापूर शहरामधील कोरोनो बाधित भागात महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त दिपक तावरे यांनी दिली भेट


सोलापूर शहरामधील कोविड-19 कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फैलाव दिवसेन दिवस वाढत असून त्यावरती महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे.इंदिरा नगर येथील कोरोनो बाधित भागात आज महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त दिपक तावरे यांनी भेट दिल. यावेळी त्या भागातील नगरसेवक तसेच मनपा अधिकारी व आरोग्य सेवक आणि पोलीस कर्मचारी यांच्याशी महापौर व आयुक्त यांनी संवाद साधला. याठिकाणी पहाणी केली असता या ठिकाणी सर्व्हे करत असताना मनपाचे आशा वर्कर मनपा कर्मचारी अधिकारी तसचे जिल्हापरिषदचे कर्मचारी  डोर to डोर  सर्व्हे  करत  असताना दिसून आले.यावेळी  जास्त जास्ती घरांचे सर्व्हे करण्यात यावे व तपासणीचे प्रमाण वाढावे यासाठी प्रत्यन करावे.यावेळी मनपाचे भावनाऋषी हॉस्पिटल हे लोकांना जाण्यासाठी लांब होत असून इतके लांब न  जाता इंदिरा नगर  भागातील मनपा शाळा क्रमांक 5 येते प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले .त्या भागातील नागरिकांची तपासणीची सोय त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी कोणत्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना मनपाच्या वतीने करण्यात येत असून जर आपल्या परिसरातील  नागरिक आजारी असतील तर त्यानं लगेच त्या ठिकाणी उपचार करण्यात येईल.


तसेच महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या मास्कचा प्रत्येकाने वापर केला पहिजे असे मत महापौर व आयुक्त यांनी व्यक्त केले.महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आरोग्य किटच यावेळी नागरीकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली ,नगर अभियंता संदिप कारंजे, नगरसेवक पातळे ,मनपा अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages