सांगोला नगरपरिषदेचा 'स्मार्ट'उपक्रम
घरपोच सेवेसाठी बनवले *"नगरसेतु"* सॉफ्टवेअर अँप्लिकेशन
सांगोला(प्रतिनिधी) सोलापूर शहरापाठोपाठ सांगोला तालुक्यात देखील कोरोना चा शिरकाव झाल्याने सर्वांनी घराबाहेर न पडता जबादारीने वागणे गरजेचे आहे. नेमकी हीच बाब ओळखून आजवर कोरोना च्या लढाईत विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्याऱ्या सांगोला नगरपरिषद तर्फे शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन किराणामाल,भाजीपाला,फळे,पाण्या चे जार, दूध पिशवी,चिकन,मटण खरेदीसाठी *"नगरसेतु"* हे सॉफ्टवेअर अप्लिकेशन विकसित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
या सॉफ्टवेअर अँप्लिकेशन मध्ये घरपोच सेवा(होम डिलिव्हरी) देणा-या सर्व दुकानांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांनी हे अँप्लिकेशन स्वतःच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची ऑर्डर नागरिकांना व्हाट्सअप्प वर किंवा दुकानदारांना कॉल करून सदरची ऑर्डर देता येणार आहे.
नागरिकांनी मेनू मध्ये दुकानदारांचे नाव,मोबाईल नंबर दिसणार आहेत तसेच निवड केलेल्या दुकानदारांना WhatsApp वर किंवा कॉल करून ऑर्डर देता येणार आहे.
ऑर्डर मिळाल्या नंतर दुकानदार ऑर्डर तयार करून घरी पाठवतील. दरम्यान आवश्यक असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल नंबर नागरिक कॉल करू शकतील आणि नागरिकांचा नंबर सुद्धा दुकानदारांकडे जात असल्याने आवशकता पडल्यास दुकानदार नागरिकांना फोन करू करतील. या अँप्लिकेशन च्या माध्यमातून घरपोच सेवा मिळू लागल्यास शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य फार महत्वाचे असल्याने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी रविवारी कार्यालयात किराणा,मेडिकल,दूध डेअरी,पाण्याचे जार विक्रेते यांच्या प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या व सहकार्याचे आवाहन केले.
आपल्या शहरापर्यंत कोरोना चा राक्षस येऊन ठेपला आहे.अशावेळी घराबाहेर पडून गर्दी करण्यापेक्षा या सॉफ्टवेअर app चा वापर करून सर्व नागरिकांनी किराणा,भाजीपाला,फळे,मेडिकल,पा ण्याचे जार, दूध,चिकन,मटण या सर्व गोष्टी घरपोच मागवून घ्याव्यात. या कामी सर्व विक्रेते,व्यापारी यांनी देखील सहकार्य करणे फार महत्वाचे आहे
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद
0 Comments