Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुकास्तरावर रोजगार हमीची कामे सुरु करा ,रणजितसिंह मोहिते पाटील यांची जिल्हा परिषदेला सूचना

तालुकास्तरावर रोजगार हमीची कामे सुरु करा 
रणजितसिंह  मोहिते पाटील यांची  जिल्हा परिषदेला सूचना 



अकलूज / प्रतिनीधी - कोरोना या जागतीक महामा रीमुळे गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व रोजगार बंद पडले आहेत . पुण्या- मुंबईसह इतर शहरातून व राज्यातून लाखो लोक गावी परतले आहेत . या लोकांच्या हाताला काम मिळावे या हेतूने जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात  रोजगार हमीची कामे सुरु करावीत . जिल्हा परिषदेने तसे   आदेश पंचायत समित्यांना द्यावेत अशी  सूचना भाजपाचे नेते  रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेला केली आहे . 
 मोहिते पाटील यांनी आज ( बुधवार ) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला .  ते  म्हणाले , जगावर कोरोनाचे महासंकट कोसळले आहे . याचा फटका शहरी तसेच ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे . सोलापूर जिल्ह्यात पुण्या - मुंबईसह इतर शहर , जिल्हा  व राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख लोक  स्थलांतरित झाले आहेत . त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने या  लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे . अशा अडचणीच्या परिस्थीतीत त्यांच्या हाताला काम देणे अत्यंत गरजेचे आहे . सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे . या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे सुरु करता येतील . त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीचे सभापती , उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर रोजगार हमीची कामे सुरु करावीत अशा सूचना त्यांनी केल्या . 

माळशिरस तालुक्यात २० हजार लोकांची आवक 
 मोहिते पाटील पुढे म्हणाले , माळशिरस तालुक्यात कोरोनाच्या महासंकटात पुण्या - मुंबईसह इतर शहर , जिल्हा व राज्यातून आज अखेर सुमारे  १८ हजार ६६१ लोक आले आहेत . आता शासनाने शहरात व इतर राज्यात अडकलेल्या लोकांनाही  आपआपल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे . त्यामुळे दररोज २०० ते २५० लोक माळशिरस तालुक्यात येत आहेत . नागरीकांनी कोरोनाचा सामना करताना शासनाचे नियम व अटी पाळून या सर्व संकटावर मात करणे आवश्यक आहे . सद्या तालुक्यातील इतर लहानमोठे व्यवसाय , उद्योग , दुकाने हळूहळू सुरु होत आहेत . त्यामुळे काही लोकांच्या हाताला काम मिळेल . परंतु तालुक्यात रोजगार हमीची कामे सुरु झाली तर मोठ्या प्रमाणात लोकांच्या हाताला रोजगार मिळेल .
Reactions

Post a Comment

0 Comments