रक्तदानासारख्या पवित्र कार्यामुळे अनेकांचे जीव वाचतात
-डॉ.मोहिते
अकलूज( प्रतिनिधी ) कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रक्तदानासारख्या पवित्र कार्यामुळे अनेकांचे जीव वाचतातअसे प्रतिपादन माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोरचे संस्थापक सद्गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज पोलिस ठाणे व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्येही अत्यंत शिस्तबद्ध सामाजिक अंतर ठेवून रक्तदान शिबीरासारखा उपक्रम राबविला हे कौतुकास्पद आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर ,गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णीचे दशरथ महाराज देशमुख,राहुल अंचलकर, इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ संतोष खडतरे, डॉ बाहुबली दोशी,डॉ अजित गांधी, डॉ रोजेश चंकेश्वरा,पवनकुमार बाजारे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा धनंजय देशमुख तर आभार माऊली मुंडफणे यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीरामध्ये यावेळी ६५ साधकांनी सहभाग घेतला.सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजीव बनकर, उदय साळुंखे,सत्यवान पराडे,अभिनंदन देशमाने,योगशिक्षक हरीभाऊ माने,नानासाहेब रोकडे,गोरख डांगे,दिग्विजय देशमुख,तानाजी शेंबडे,विक्रम भोसले,भरत भानुशाली,सागर चोरमले,प्रमोद लंबटकर, तेजस फुले, सौरभ भोसले यांनी सहकार्य केले.
0 Comments