कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यास सहकार्य करा जिल्हा प्रशासनाकडून नगरसेवकांना आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 21, 2020

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यास सहकार्य करा जिल्हा प्रशासनाकडून नगरसेवकांना आवाहन

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यास सहकार्य करा
जिल्हा प्रशासनाकडून नगरसेवकांना आवाहन


सोलापूर, :- सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गाची  साखळी तोडण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आज करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आज सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली. यावेळी पेालीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, नगरप्रशासन अधिकारी पंकज जावळे उपस्थित होते.
बैठकीस प्रारंभी आयुक्त दीपक तावरे यांनी महापालिकेतर्फे कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी केले जात असणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला हवी, असे सांगितले. यासाठी पदाधिकारी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांना मदत करावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिक उशीरा उपचारासाठी येतात. उपचारासाठी लवकर यावे, आजार लपवले जाऊ नये यासाठी नगरसेवकांनी प्रभागात नागरिकांच समुपदेशन करावे, आपल्या प्रभागातील खासगी डॉक्टरांना प्रतिबंधित क्षेत्र वगळून दवाखाने सुरु करण्याचे आवाहन करावे, असे सांगितले.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर आजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला ,पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी सभागृह नेते श्रीनीवास करली, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, शिवानंद पाटील, संतोष भोसले, भारतसिंग बडुरवाले, नरसिंग कोळी, नगरसेविका शहिदाबानो शेख, श्रीनिवास पुरुड, श्री. पातळे, श्री. आंबेवाले, नगर अभियंता संदीप कारंजे, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, नगरसचिव रुऊफ बागवान, सिध्देश्वर बोरगे, मनपा अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages