सहयाद्री फार्मसी महाविद्यालयाच्या ऑनलाईन स्टडी वर्क फ्रॉम होम उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2020

सहयाद्री फार्मसी महाविद्यालयाच्या ऑनलाईन स्टडी वर्क फ्रॉम होम उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम संपन्न

सहयाद्री फार्मसी महाविद्यालयाच्या ऑनलाईन स्टडी वर्क फ्रॉम होम उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम संपन्न 


सांगोला (प्रतिनिधी) कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगात  कोवीड 19 या विषाणूने धुमाकुळ घातला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन चा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात खंड पडला आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शक सुचनेनूसार सर्व प्राध्यापक वृंदाने विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अभ्यासक्रम पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानूसार सर्व प्राध्यापक वृंदांनी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम प्रणाली जसे की, गुगल क्लासरुम व इतर ऑनलाईन टिचिंग मोडयुल्स व टुल्सचा वापर करुन सर्व विद्यार्थ्यांना अभ्सासक्रमाविषयी माहीती देणे, प्रश्न चाचणी घेणे, व्हीडीओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शंकेचे निरसण करणे, त्यांना अभ्यासासंबंधित सर्व इ. पुस्तके, पीडीएफ, पीपीटी व नोट्स माहीती संग्रह पाठवून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात परिक्षेवेळी याचा लाभ होणार आहे. याबरोबरच महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू प्रादूर्भावबद्दल जनजागृती करुन विद्यार्थ्यांना व पालकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले या उपक्रमाचे सर्व पालक व विद्यार्थीवर्गातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages