संजय पाटिल-भिमानगर यांच्या प्रयत्नांला आखेर यश रेशन धारकाला सात वर्षा नंतर मिळाले रेशन
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माढा तालुक्यातील भिमानगर येथील १५० रहिवाशांना गेली २०१३ सालापासून शासनाच्या गलथान कारभारामुळे रेशनकार्ड मिळून देखील त्यावर मिळणारे धान्य नसल्याने या लाभापासूश सात वर्षा पासुन वंचित राहावे लागले होते.
शेतकऱ्यांला तसेच जनतेला ज्ञायासाठी सारखेच झगडणारे कोंढार भागाचे नेते माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील- भिमानगरकर यांनी मार्च महिन्यात तहसील वर मोर्चा काढून ग्रामपंचायत ठराव करून भिमानगर मधील १५० लोकांना रेशनकार्ड वरील धान्य मिळावे यासाठी व रेशनकार्ड वरील लाभ मिळवा यासाठी प्रयत्न केले होते.
यामुळे गुरुवारी दिवसभर रेशनकार्ड मधील प्रत्येक सदस्यांना गहू तीन किलो तर तांदूळ दोन किलो धान्य मिळाले असून असा लाभ आता या गोरगरीब कुटुंबानां कायमस्वरूपी मिळणार असल्याचे संजय पाटील भिमानगरकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संजय पाटील भिमानगरकर,संभाजी ब्रिगेड माझी जिल्हा अध्यक्ष रमेश पाटील, सरपंच मंदाकिनी पाटील, मा.सरपंच नितीन मस्के,धर्मराज पाटील, वसंत पाटील, प्रशांत पाटील, वि.शिंं.स.सा.का संचालक वेताळ जाधव,विजय पतुले, ,ग्रामपंचायत सदस्य नेताजी चमरे,उपसरपंच पप्पू ढगे,भैय्या शिंदे,साहेबराव जाधव,राजेंद्र बनसोडे, बंडू पाटुळे,राहुल टिंगरे व सर्व लाभार्थी उपस्थित होते.
0 Comments