Ads

Ads Area

दिलासादायक !! घेरडी येथील १९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह--प्रांताधिकारी उदयसिंह भोसले

दिलासादायक !! घेरडी येथील १९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह--प्रांताधिकारी उदयसिंह भोसले

बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे केले आवाहन

सांगोला (जगन्नाथ साठे ) मौजे घेरडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.यामध्ये कोठेही आजारी व्यक्ती आढळल्या नाहीत. मौजे घेरडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 21 व्यक्ती सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या होत्या या पैकी 19 व्यक्तींची कोरोना टेस्ट घेण्यात आली. दोन व्यक्तींचे नमुने  प्रत्यक्ष संपर्क नसल्याने घेण्यात आलेले नाहीत. सदर सर्वच्या सर्व 19 व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. या मुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.मात्र  तरीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोलापूर येथे तपासणीसाठी आलेल्या सर्वच्या सर्व व्यक्ती पुढील कालखंडात होऊ शकणारा संभाव्य धोका रोखण्यासाठी पुढील १४ दिवस सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे निरीक्षणात राहतील तसेच  करोना विषाणूचा भविष्यात   होऊ शकणारा  संभाव्य उदभव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मौजे घेरडी येथे सीमा बंद केलेले प्रतिबंधित क्षेत्राबाबत पुढील किमान 14 दिवस पर्यंत तसेच पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिसर सीलबंद परिस्थिती कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी प्रांताधिकारी भोसले यांनी दिली. तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन ही केले.सीमा बंद केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शाळेमध्ये  बाहेरून आलेल्या अथवा बाधित व्यक्तीशी अप्रत्यक्ष संपर्क असणाऱ्या 12 व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली आहे.तसेच ज्यांचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा 12 व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून घरात विलगीकरण करून ठेवणेत आले आहे. सांगोला तालुक्यामधील कोरोना बाधित व्यक्तीच्या  अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या  एकूण 137 व्यक्तींना स्वतंत्ररीत्या घरात विलगीकरण करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाटंबरे येथील एक अधिकारी व पाच कर्मचारी तर ग्रामीण रुग्णालय सांगोला येथील एक डॉक्टर व एक लिपिक यांचा समावेश आहे. आज दिनांक 30 एप्रिल रोजी 6 स्वयंसेवकांमार्फत 229 व्यक्तींना 371 किलो भाजीपाला, 2 स्वयंसेवकांमार्फत 57 व्यक्तींना 30 लिटर दूध व 11 स्वयंसेवकांमार्फत 223 व्यक्तींना ३८५५ किलो किराणामाल वाटप करण्यात आलेला आहे.त्यासाठी एकूण १९ स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सदर परिसरांमध्ये सुरळीत रीत्या सुरु आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close