Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमण्याची माजी आमदार राजन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे मागणी

कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमण्याची माजी आमदार राजन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी


    महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहर व ग्रामीण मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
      सोलापूर शहर व जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा मोठ्या जोमाने कोरोना संकट निवारण्याचे काम करत असताना मुंबई-पुण्याच्या धर्तीवर या प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वयएक अधिकारी नेमण्याची मागणी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते राजनजी पाटील यांनी फोनद्वारे अजितदादा पवार यांच्याकडे केली
        महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नंतर सोलापूर जिल्हा व शहर मध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.
    सोलापुर जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त व पोलिस अधिक्षक, आरोग्य अधिकारी आरोग्य यंत्रणा सह कार्यरत आहे यांच्यामध्ये समन्वय राहावा व कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी यासाठी
पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे समन्वय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे त्याप्रमाणे सोलापुरातही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करण्याची मागणी राजनजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे फोन द्वारे आज केली
    यावेळी बोलताना अजित दादा म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील माहिती घेऊन लवकरात लवकर स्वतंत्र बैठक लावून जिल्ह्याला  समन्वय अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments