पन्नास गरजू कुटुंबास जीवणावश्यक वस्तूचे वाटप
अकलूज ( प्रतिनिधी ) रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व दोस्ती ग्रुपचे संस्थापक पै आण्णासाहेब सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडबावी तालुका माळशिरस या ठिकाणच्या गरजू गरीब अशा पन्नास कुटुंबास ४ एप्रिल रोजी किराणा माल, मास्क, बिस्किटे पाणी बॉटल देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
जगभरात कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने कहर केला आहे. आपल्याकडील वाढता प्रादुर्भाव पहाता अखंड देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. उदभवलेल्या परस्थितीमुळे ज्यांची हातावरील पोट आहे, अशांची कामे बंद झाली आहेत. अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून खारीचा वाटा उचलत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व दोस्ती ग्रुपचे संस्थापक आण्णासाहेब सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व गरीब कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळीअधिक परिश्रम नितीन जाधव, राजू जाधव, नवा काशीद, अक्षय पाटोळे, श्रीनाथ काशीद, राम बडे, बबनदादा चोरमले, सागर सुरवसे, सागर नेटके, आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments