संचारबंदीच आपला जीव वाचवू शकते--पो.नि. राजेश गवळी सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात पथसंचलन संपन्न
सांगोला (जगन्नाथ साठे) सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सांगोला शहर आणि तालुक्यात संचार बंदी लागू आहे. सांगोला शहर आणि तालुक्यातील जनतेने संचारबंदीचे पालन करावे, संचारबंदीच आपला प्राण वाचवू शकते,अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच आपण घराबाहेर या, कायद्याचे पालन करा,"stay at home,"शक्यतो दुचाकी गाड्याचा वापर टाळा,be careful रहा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी व्यक्त केले, ते सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने सांगोला शहरातून आयोजित केलेल्या पथसंचलनावेळी बोलत होते.
संचार बंदीचे पालन कडक झाले पाहिजे,नागरिकांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे, आणि हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पो. नि.राजेश गवळी यांनी सांगितले. सदर पथसंचलन सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले.सदर संचलनात ६५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सदर संचलन हे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या प्रेरणेने पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
0 Comments