Hot Posts

6/recent/ticker-posts

राज ठाकरेंच्या 'त्या' सूचनांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

राज ठाकरेंच्या 'त्या' सूचनांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या संबंधित पत्रकार परिषद घेतली. यात केलेल्या काही सूचना उद्धव ठाकरेंनी साधलेल्या संवादात दखल घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात असून त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दिली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का? भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना तसेच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. यांची हात उचलायची हिंमत होते कशी ? पोलिसांना तुम्ही शिव्या देता ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

नोटांवर थुंकण्याऱ्या विकृतांवर उद्धव ठाकरे संतापले. ते म्हणाले कि, समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही.'मरकजवरून राज्यात आलेल्या सर्वांचा शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात…त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments