Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांना मदतीची हाक ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मदतीसाठी आवाहन

स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांना मदतीची हाक ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मदतीसाठी आवाहन



            सोलापूर, दि. 4 :  लॉकडाऊन मुळे अडकलेल्या स्थलांतरिक मजूर, निराधार आणि गरजू लोकांना मदतीसाठी  जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि उद्योजकांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

            अडकलेले मजूर आणि निराधार लोकांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल रात्री झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, अडकलेल्या लोकांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्याची प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी  धान्ये आणि अनुषांगिक साहित्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला यासाठी मदत करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. अन्नधान्य देणाऱ्या इच्छुकांनी  जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील (982290907), उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे (9960600975), शैलेश सुर्यवंशी (7588327994) यांच्याशी  संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत  करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करता येऊ शकतो, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments