Ads

Ads Area

*बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व बहुजन क्रांति मोर्चा यांच्या माध्यमातून गरजूंना *"एक हात मदतीचा"*

*बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व बहुजन क्रांति मोर्चा यांच्या माध्यमातून गरजूंना *"एक हात मदतीचा"*

          बोरघर / माणगांव : कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी संपूर्ण देशात एकवीस दिवसांचा लॉक डाऊन चालूझाल्यापासून अशा काळात सर्व हॉटेल खानावळ मोलमजुरी बंद असल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गरीब सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना दोन वेळचा अन्नाचा घास मिळावा याकरिता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे माध्यमातून दैनंदिन लागणारे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्यामध्ये तेल डाळ साखर ; गहू आटा ; कांदे बटाटे यांची पॅकिंग करून गरीब गरजू हातावर पोट असणारे कामगार मोलमजुरी करणारे साले बोद्ध वाडी ,खरवली फाटा,आदिवासी वाडी ,नानोरे बौद्धवादी,निलगुण बौध्द वाडी,यांच्याकरिता त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे .
संपूर्ण देशात लोक डाऊन असताना आपल्या शहरातील गावातील नारिकांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या भावनेतून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे समजून ते हि सेवा करत आहेत. 

     राकेश मोरे  बहुजन क्रांती मोर्चा उपाध्यक्ष रायगड यांनी सांगितले की  आता आपण  *14 एप्रिल 2020 रोजीची विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा विचार केला आहे.*  14 एप्रिल रोजी आपण 128 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहोत. यावेळी मदत करताना आपल्यातून  काही लोक वस्तूंच्या स्वरूपात मदत करणार आहेत. राकेश मोरे 100 किलो तांदूळ, प्रदीप कांबळे 100 किलो कांदे, विनोद मोरे 25 किलो तांदूळ , कासे सर 50 किलो बटाटे, विठोबा मोरे साई 50 किलो बटाटे देणार आहेत. आपल्याला सुद्धा असे आवाहन करण्यात येत आहे की आपण वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी. ज्यांना अशी मदत करायची आहे त्यांनी कृपया दिपक मोरे, अध्यक्ष, बामसेफ मांणगांव , सुर्यकांत कासेसर अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड, राकेश मोरे बहुजन क्रांती मोर्चा रायगड, यांच्याकडे आपले नाव नोंदवावे. असे आव्हान केले आहे
    यावेळी बोलताना श्री सूर्यकांत कासे सर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष रायगड म्हणाले नागरिकांनी घरातच राहून आपली आपल्या कुटुंबाची तसेच देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन सोसिअल डिस्टन्स पाळावे म्हणजे या कोरोनाच्या महामारीच्या संकटातून आपली सर्वांची सुटका होईल .

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close