घराला आग लागून उध्वस्त झालेला संसार पुन्हा सुरू करण्यासाठी माने कुटुंबाला राष्ट्रवादीचे नेते दिपकआबांचा आधार
माने कुटुंबियास संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य व रोख रक्कम स्वरुपात केली मदत
सांगोला : हंगिरगे ता. सांगोला येथील शेतकरी दामू माने यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, शेळ्या, कोंबड्या यासह जीवनावश्यक वस्तू जळून भस्मसात झाले आहे. यामुळे माने कुटुंबीय उघड्यावर आल्याने, या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आम. दिपकआबासाळुंखे-पाटील यांनी हंगिरगे येथे जावून माने कूटुंबाला स्वखर्चातून संसारोपयोगी साहित्य धान्य व लोकसहभागातून रोख रक्कम देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या हंगिरगे या भागातील शेतकरी दामू माने यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य धान्य, भांडी, शेळ्या,कोंबड्या यासह इतर सर्व जीवनावश्यक वस्तू आगीत भस्मसात झाले आहेत. अस्मानी संकटाचा सामना करत असताना निसर्गाने व त्यानंतर आता नशिबानेही साथ सोडल्याची वेळ येथील शेतकऱ्यावर आली आहे. परिणामी माने कुटुंबे उघड्यावर आले आहे. या बळीराजाला खर्या अर्थाने मदतीची गरज आहे. आणि सदर कुटुंबाची तळमळ लक्षात घेता, मा.आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तातडीने या भागात जावून स्वखर्चाने संसार उपयोगी साहित्य देत, 50 की. ज्वारी, 50 की. बाजरी, 50 की. गहू, 25 की. तांदूळ यासह लोकसहभागातून रोख रक्कम ही देण्यात आली. त्याचबरोबर दामू माने यांच्या जळालेल्या घराची पाहणी करत दामू माने यांना दिलासा देत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. तसेच तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत तातडीने पंचनामे करून शासनाची मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी चर्चा केली.
राजकारण समाजकारण करत असताना पक्षपात बाजूला ठेवून अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याची भूमिका मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यांनी बजावली आहे. ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्यावेळी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मदतीची भूमिका बजावली आहे. यामध्ये माने कुटुंब यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पुढाकार घेऊन केलेली मदत निश्चितपणे त्या कुटुंबाला मोठा आधार देणारे ठरत आहे. यामुळे दीपकआबांच्या या कार्यामुळे हंगिरगे गाव परिसरातील नागरिकांनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिले व त्यांचे आभारही मानले.
चौकट :
आबा तुम्ही देवासारखे धावून आलात.....
शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना मुळे कुटुंबातील आम्ही सर्वजण घरामध्ये आहोत. बाहेरुन एक नवा पैसा घरामध्ये येत नाही. अशावेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मोठा खटाटोप सुरू आहे. यामध्ये घराला आग लागली आणी आमचं सर्व स्वप्न उध्वस्त झालं, कुटुंब रस्त्यावर आलं. अस्मानी संकटाचा सामना करत असताना निसर्गाने व त्यानंतर आता नशिबानेही साथ सोडली होती. आता पुन्हा एकदा घर उभा करणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवण मोठे आव्हान समोर उभे होते. अशा परिस्थितीत विठ्ठलाकडे साकडे घातले की देवा तूच धावून ये..... आणि दीपक आबा तुम्ही देवासारखा धावून आलात
दामू माने
नुकसानग्रस्त शेतकरी हंगिरगे
0 Comments