Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवशंकर प्रतिष्ठान च्या वतीने केली परप्रांतीयांना नाष्टयाची सोय



*शिवशंकर प्रतिष्ठान च्या वतीने केली परप्रांतीयांना नाष्टयाची सोय*

 टेंभुर्णी ; जगामध्ये कोरना ने धुमाकूळ घातल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन  केल्यामुळे व जिल्हा बंदीचे आदेश असल्याने अनेक जण परप्रांतीय महिला पुरुष आपल्या राज्याकडे चालत जात असताना टेंभुर्णी पोलिसांना नाकाबंदी व पेट्रोलिंग करत असताना आल्याने  महिला पुरुषांना टेंभुर्णी येथील आश्रम शाळेमध्ये राहण्याची सोय केली असता याठिकाणी  टेंभुर्णी शहरातील सामाजिक संघटनानी सामाजिक कार्य  म्हणून   जेवणाचा हातभार लावत आहेत राहण्यासाठी सोय करत आहेत त्याच प्रमाणे आज सकाळी टेंभुर्णी येथील शिवप्रतिष्ठान व शिवशंकर हॉटेल चे मालक बाळासाहेब चव्हाण यांनी आश्रम शाळे वरती जाऊन सर्व महिला पुरुष व लहान मुलांना नाष्टा पाण्याची सोय केली होती याकरता जेवण बनवून वाढेपर्यंत शिव शंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण अंकुश कुटे  योगेश डोके राजू ढगे यांनी परिश्रम घेतले
Reactions

Post a Comment

0 Comments