नाझरा येथे गरजुना जीवनावश्यक वस्तचें वाटप.
सांगोला ; आज जगात सर्वत्र कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून कोरोना पासून बचाव करण्यासाठी सध्या देशभर लॉक डॉऊन असून या काळात गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडता येत नाही अशा गरजू लोकांना नाझरे ता- सांगोला येथील युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, सतीश आदट, भाऊ पाटील, आणि मोहर मोहन बाबर यांनी एकत्र येवून किराणा मालाचे किट देवून त्यांच्या अन्नाची सोय केली.या सामाजिक कार्यातून त्यांनी सामाजिक भान जपले आहे.
सदर किराणा साहित्याचे किट सांगोला पोलिस स्टेशनचे पठाण साहेब, निंबाळकर साहेब उपस्थित होते. आज सर्वत्र देशांमध्ये संचारबंदी लागू असून या संचार बंदीच्या काळात अनेक हातावर पोट असणारे कुटुंब अडचणीत आहेत. या कुटुंबांना जगण्यासाठी आवश्यक असणारा किराणा साहित्यही मिळणे मुश्कील झाले असून अशा काळात या नाझरे गावांतील युवकांनी एकत्र येऊन गरजू लोकांना किराणा साहित्याचे वाटप केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments