Hot Posts

6/recent/ticker-posts

विठूरायाच्या पंढरीत निराधारांची सोय -प्रांताधिकारी सचिन ढोले

     विठूरायाच्या पंढरीत निराधारांची सोय   
 -प्रांताधिकारी सचिन ढोले


      पंढरपूर, दि.06:  कोरोना  विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  सध्या देशभरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.  अशा परिस्थितीत स्थलांतर केलेल्या तेलगंणा, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील परप्रांतिय तसेच  निराधार, बेघर, बेरोजगार, भिकारी तसेच मजुरांची  भोजन व निवाऱ्याची  व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
     कारेोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील केंद्रे महाराज मठ,  बेंगोलकर मठ, 65 एकर येथील एम.टी.डी.सी निवास व्यवस्था, माऊली बेघर निवास आदी  ठिकाणी नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या नागरीकांना  नाष्टा, जेवण, निवारा तसेच आवश्यक गरजा तसेच वैद्यकीय सुविधा प्रशासनामार्फत देण्यात येत आहेत. तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती पंढरपूर, पंढरपूर रनर्स असोशिएसन, रॉबिन हूड आर्मी, पत्रकार संघ, दानशूर व्यक्ती व विविध संस्था व संघटना यांच्यामार्फतही   भोजनाची  व्यवस्था करण्यात  येत असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
                                                                   
Reactions

Post a Comment

0 Comments