कोरोनाला हरवण्यासाठी मा.आ.राजन पाटील कुटुंबासोबत घराच्या मैदानात सज्ज
जिल्ह्याच्या राजकारणातील वजनदार व्यक्तीमत्व म्हणून माजी आमदार राजन पाटील यांची ख्याती आहे. राजन पाटील यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याला प्राधान्य दिले. प्रत्येक कार्यकर्त्याशी ते आपुलकीने वागतात. परंतु 'कोरोना'मुळे ते गेल्या १५ दिवसांपासून अनगर (ता.
मोहोळ) येथील निवासस्थानीच आहेत. सकाळी सहा वाजता उठल्यानंतर साडेसहा ते साडेसात एक तास व्यामाम करणे, नंतर आंघोळ, पूजा अर्चा करणे, साडेआठ वाजता ब्रेकफास्ट घेणे, ९ ते १० टीव्हीवर रामायण
पाहणे, नंतर दुपारी एक वाजेपर्यंत राजन पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्री, चिरंजीव बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, बाळराजेंच्या पत्नी प्रियंका आणि तावजी व युगंधरा ही दोन मुले, अजिंक्यराणा यांच्या
पत्नी प्राजक्ता त्यांची कन्या नयनतारा आणि राजन पाटील यांच्या बहीण मिना देशमुख यांच्यात एकत्रीतपणे गप्पा रंगतात. जुन्या आठवणींना उजाळा देणे, नातेवाईकांशी दूरध्वनीवरुन संवाद साधणे सुरु असते. त्यानंतर पाच वाजेपर्यंत आराम करणे, मोबाईलवर व्हॉटसअॅप, फेसबुक पाहणे, बातम्या पाहणे सुरु असते. युट्यूबवर स्व. यशवंतराव चव्हाण, डॉ. शंकर अभ्यंकर, स्व. इंदिरा गांधी, स्व. बाळासाहेब ठाकरे
यांची भाषणे ऐकण्याचा राजन पाटलांचा कार्यक्रम ठरलेला आहे. ५ पाजता टीव्हीवर संभाजीराजे मालिका पाहणे, सहा वाजता घरासमोरील गार्डनमध्ये फिरणे, ७ वाजता महाभारत मालिका पाहणे, रात्री नऊ
वाजता जेवण त्यानंतर मराठी व हिंदी न्यूज चॅनेलवरील बातम्या पाहणे. आणि रात्री साडेदहा वाजता झोपणे असा दिनक्रम सुरू आहे.
0 Comments