महुद मंडल कृषी विभाग व विविध कार्यकारी सोसायटी चिक महूद यांचे कार्य आदर्शवत :- आमदार शहाजीबापू पाटील
महूद मंडळ कृषी विभाग व विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने
गरजूंना अन्नधान्य वाटप
सांगोला ; सध्या कोरोना विषाणू पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने लॉक डाउन चे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सध्या तालुक्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने तालुक्यातील रोजंदार, हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांना काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. महूद मंडल कृषी विभाग व विविध कार्यकारी सोसायटी चिक महूद यांच्यावतीने गावातील गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करून एक आदर्श कार्य केले आहे. याचा आदर्श ईतर नागरिकांनी देखील घ्यावा असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्यातील महूद या गावी हात मजूर व बेघर लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महूद मंडल कृषी विभाग व विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने गावांमधील 68 गरजू लोकांना आ. शहाजी बापु पाटील यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. या किटमधे प्रत्येकी 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो साखर व 1 चहा पावडर चा पुडा या साहित्याचा समावेश आहे.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने शासन घेत असलेले सर्व निर्णय जनतेच्या हितासाठी आहेत. शासनाच्या आदेशाचे कडेकोट पालन होण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी काही दिवस संयम बाळगून शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून तालुक्याला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुशीला कदम, उपसरपंच आक्काताई भोसले, मंडल कृषी अधिकारी गुरूलिंग चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम, संतोष चौधरी, बापू वाघमोडे , विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश तांबोळी, सचिव प्रभाकर सातपुते, तलाठी गणेश तनमोर, ग्रामसेवक विनोद कोळी यांच्यासह सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व गरजू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments