दीनदयाल योजनेतंर्गत बेघर व निराधारांना
- मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर
पंढरपूर 06-: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशभरात संचार बंदी लागू झाली असल्याने शहरातील निराधार, बेघर, बेरोजगार, भिकारी तसेच मजुरांची भोजन व निवाऱ्याची एकूण 177 नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दीनदयाल अंत्योदय योजनेतंर्गत पंढरपूर नगर पालिकेमार्फत माऊली बेघर निवास येथे करण्यात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली आहे.
या योजनेतंर्गत नागरीकांना जेवण, निवारा, आरोग्य सुविधा व आवश्यक साधन सामृग्री नगरपालिके मार्फत देण्यात येत आहे. तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती पंढरपूर व विविध संस्था व संघटना यांच्यामार्फतही भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने विविध उपायोजना करण्यात आल्या आहेत. नगरपालिका हद्दीतील 102 खासगी व उपजिल्हा रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी व परिसरात ब्लीचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच माहितीही नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील ज्या नागरीकांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था नसेल अशा नागरिकांनी पंढरपूर नगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहनही मुख्याधिकारी मानोरकर यांनी केले आहे.
0 Comments