Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री बसवेश्वर जयंती घरीच साजरी करा- नागेश बेनूरकर

श्री बसवेश्वर जयंती घरीच साजरी  करा- नागेश बेनूरकर



सोलापूर-संपूर्ण शहरात कोरोना या विषाणूचे सावट असल्याने शिव बसव सामाजिक संस्था विद्यानगर शेळगी येथील मंडळाने बसवेश्वर जयंती सालाबादप्रमाणे प्रमाणे मोठ्या
प्रमाणत व जल्लोषात साजरी न करता आप आपल्या घरीच मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचे मंडळाने ठरवले आहे. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष नागेश बेनूरकर यांनी सांगितले आहे. सल्लागार  अॕड.हिराचंद अंकलगी,मन्मथ कोनापुरे,प्रकाश आळंगे,मल्लिनाथ मेंडगुदले,मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकर बंडगर तसेच उपअध्यक्ष मालिकार्जुन सावळगी,कार्याध्यक्ष गोंविंद पुप्पल सचिव मल्लय्या मठपती-स्वामी, सहसचिव मुरलीधर पवार, खजिनदार दीपक मानवे राहुल सावळगी, प्रसाद अक्कलगी, अक्षय हुलगुर, ऋषिकेश पवार, नागेश पधारकर, श्रीशैल्य लोकापुरे,  आदी मंडळाचे पदाधिकारी यांनी या वर्षी
बसवेश्वर जयंती ही घरीच मोठया उत्साहात साजरी करण्याचे अवाहन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments